राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपये पर्यंत विमा लाभ ! वित्त विभागाकडुन शासन निर्णय निर्गमित ! GR दि.24.01.2023

Spread the love

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये बदल करण्याबाबत वित्त विभागाकडून दि.24 जानेवारी 2023 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यामध्ये कर्मचाऱ्यांना संवर्गनिहाय 15 लाख रुपये ते 25 लाख रुपये पर्यंचा विमा लाभ मिळणार आहे . या संदर्भातील वित्त विभागाकडून दि.24.01.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरीता संपुर्णत : कर्मचाऱ्यांच्या वर्गणीवर आधारित अशी राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना दि.04.02.2016 च्या शासन निर्णयान्वये दि.01 एप्रिल 2016 पासून लागू करण्यचात आली आहे .सदर योजना पूढे सुरु ठेवण्यास दि.18.02.2017 च्या निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे .दि.01 एप्रिल 2023 पासून राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी व राशीभूत रक्कम यामध्ये वाढ करण्यात येत असून व सदर वर्गणी राशीभूत रक्कम गटनिहाय निर्णयामध्ये नमुद करण्यात आलेली आहे .

गट निहाय प्रस्तावित राशीभूत विमा रक्कम व प्रस्तावित वार्षिक वर्गणी व वस्तू व सेवाकर व वार्षिक वर्गणी तक्ता पुढीलप्रमाणे पाहुयात .
माहे फेब्रुवारी महिन्याची वेतनाची देयके सादर झाल्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्यांची वर्गणी माहे फेब्रुवारी महिन्यामध्ये वसूल करण्यात आलेली नाही .अशा कर्मचाऱ्यांना अपघात योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी योजना लागू हेाण्याच्या कालावधीनुसार वर्गणी खालील प्रमाणे वसूल करण्यात येणार आहे .

योजनेतील सदर सुधारणेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक कार्यालय प्रमुखांने त्यांच्या अधिनस्थ वेतन देयकातून अपघात विमा वर्गणी माहे फेब्रुवारी 2023 देय मार्च 2023 च्या वेतनातून व तदनंतर दरवर्षी कपात करणे आवश्यक असणार आहेत .या संदर्भातील वित्त विभागाकडुन दि.24.01.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , पदभरती योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment