राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.30.01.2023 रोजी निर्गमित झालेला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

खाजगी 100 टक्के अनुदानित शाळेतील शिक्षक हे पद केवळ नॉन क्रिमिलअर आरक्षण निश्चिती करण्याच्या प्रयोजनार्थ , शासकीय सेवेतील शिक्षक पदाशी समतुल्य असल्याचे घोषित करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडुन दि.30 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

खाजगी अनुदानित शाळेतील कर्मचारी हे थेट शासकीय कर्मचारी समजले जात नाहीत .खाजगी अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) विनियमन अधिनियमन , 1977 व महाराष्ट्र  खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावली , 1981 च्या तरतुदी लागु आहेत . तथाप‍ि खाजगी अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांसाठीचे नियम सेवाशर्ती या राज्य शासनामार्फत निश्चित केल्या जातात .

तसेच महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियम 1981 मध्ये तरतुद नसलेल्या मुद्यांबाबत महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील संबंधित तरतुदी अनुदानित शाळांतील कर्मचारी यांना लागू केल्या जातात .या पार्श्वभुमी विचारात घेता , खाजगी शंभर टक्के अनुदानित शाळेतील शिक्षक व शासकीय सेवेतील शिक्षक हे दोन्ही पदे समतुल्य असल्याचे घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .

यानुसार आता खाजगी शंभर टक्के अनुदानित शाळेतील शिक्षक व शासकीय सेवेतील शिक्षकांच्य बाबतीत केवळ नॉन क्रिमिलेअर आरक्षण निश्चिती करण्याच्या प्रयोजनार्थ खाजगी 100 टक्के अनुदानित शाळेतील शिक्षक व शासकीय सेवेतील शिक्षक ही पदे संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदांशी समतुल्य समजण्यात येतील , असा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आलेला आहे .

या संदर्भातील राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा दि.30 जानेवारी 2023 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment