राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.13.01.2023

Spread the love

राज्य शासन सेवेतील विदर्भ गृहनिर्माण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अंशदायी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजाची रक्कम वितरीत करणेबाबत गृहनिर्माण विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.13 जानेवारी 2023 रोजी निर्गमित झालेला आहे .या संदर्भातील गृहनिर्माण विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

मुख्यलेखाशिर्ष व्याजप्रदाने , अल्पबचत भविष्य निर्वाह निधी इ.वरील व्याज 104 राज्य भविष्य निर्वाह निधी वरील व्याज इतर संकीर्ण भविष्य निर्वा निधी विदर्भ गृहनिर्माण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अंशदायी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज भारित 45 व्याज या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता रुपये 1,43,85000/- इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे .

वित्त विभागाकडुन सदर एकुण तरतुदीपैकी 50 टक्के म्हणजेच 71,92,500/- इतका निधी वितरीत करण्यात आला आहे . वित्तीय वर्ष 2022-23 करीता खर्चासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली 71,92,500/- इतकी रक्कम दि.20.07.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये म्हाड प्राधिकारणास पुस्तकी समायोजन करण्याकरीता यापूर्वीच उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

आता वित्त विभागाकडुन सदर एकुण तरतुदीपैकी उर्वरित 50 टक्के म्हणजेच 71,92,500/- इतका निधी बीम्य प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . या संदर्भातील गृहनिर्माण विभागाकडुन निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक / पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment