राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01 जुलै 2022 पासुन सुधारणा करण्याबाबत अखेर वित्त विभागाकडुन दि.10 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे . डी. ए वाढी संदर्भातील वित्त विभागाकडुन निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य शसकीय कर्मचारी व इतर पात्र पुर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता . यानुसार राज्य शासन आता असे आदेश देत आहे कि , दि.01 जुलै 2022 पासुन 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 34 टक्के वरुन 38 टक्के करण्यास राज्य शासनाकडुन मंजुरी देण्यात आली आहे . सदर महागाई भत्ता वाढ दि.01 जुलै 2022 ते दि.31.12.2022 या कालावधीतील थकबाकीसह माहे जानेवारी 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश राज्य शासनाकडुन देण्यात आले आहे .
तसेच यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून मंजुर अनुदानातून भागविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत , संबधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशिर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
4 टक्के महागाई भत्ता वाढ संदर्भातील सविस्तर GR डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
सरकारी कर्मचारी विषयक , सरकारी पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !