Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना आता केंद्र सरकारच्या धर्तीवर 41 टक्के महागाई भत्ता वाढीचा मिळणार लाभ !

Spread the love

केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडुन ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर झालेले असून ,सदरच्या निर्देशांक आकडेवारी नुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून आणखीण 3 टक्के डी.ए वाढ जाहीर करण्यात येणार आहे . याच धर्तीवर देखिल महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना देखिल लाभ मिळणार आहे . या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

राज्य कर्मचारी संघटनांनी राज्य शासनास दिलेल्या निवेदनांमध्ये असे नमुद करण्यात आलेले आहेत कि , केंद्र सरकारप्रमाणे वाढीव महागाई भत्ताचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना लगेच लागु करावा . जेणेकरुन राज्य शासन सेवेतुन सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वर विपरीत परिणाम होणार नाही . त्याचबरोबर अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत डी.ए फरकासाठी खुप दिवस कोषागार कार्यालयांमध्ये फेरफटका माराव्या लागतात .

शिवाय सध्या राज्यांमध्ये निवडणुकांचे वारे सुरु असल्याने , राज्य शासनांकडुन कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ करण्याची दाट शक्यता आहे . कारण कर्मचारी अगोदरच जुनी पेन्शनच्या मुद्दयावर मोठ्या प्रमाणात नाराज आहे . यामुळे निवडणुकांच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरीता राज्य शासनांकडुन केंद्र सरकारप्रमाणे 41 टक्के दराने वाढीव डी.ए चा लाभ अनुज्ञेय करु शकते .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment