खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांच्या या तीन प्रलंबित बाबींसाठी अर्थसंकल्पात विशेष भर !

Spread the love

राज्यातील कर्मचाऱ्यांच्या अनेक बाबी प्रलंबित आहेत , परंतु या तीन प्रमुख बाबीसाठी सन 2023-24 आर्थिक वषांच्या अर्थसंकल्पामध्ये विशेष भर देण्यात येईल . ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा रोष कमी होईल व कर्मचाऱ्यांना मोठे फायदे होणार आहेत . अशा प्रलंबित सविस्तर बाबी पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना सन 2005 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यात यावी .या मागणीवर राज्य सरकारकडुन प्रथम प्राध्यान्याने विचार करुन अर्थसंकल्पात विशेष भर देण्याची शक्यता आहे . जुनी पेन्शन लागु करणेबाबत , राज्याचे उपमुख्यमंत्री नंतर राज्याचे मुख्यमंत्रीने देखिल सकारात्मक भुमिका घेतली असल्याने , राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शनचा लाभ अनुज्ञेय होणार आहे .

यानंतर राज्य कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी दुसरी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे . केंद्र व देशातील इतर 25 राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ( Retirement Age ) 60 वर्षे केले आहे . याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत अर्थसंकल्पात विशेष तरतुद केली जाईल .

राज्यातील सरकारने बक्षी समिती खंड -2 अहवाल स्विकारला असल्याने , या अहवालानुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत .याकरीता आवश्यक 240 कोटी रुपयांची निधींची उपलब्धता अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे .

सरकारी कर्मचारी विषयक ,शासकीय योजना / सरकारी पदभरती व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Comment