State Employee : वाढीव किरकोळ रजा , अर्जित रजा व अन्य सुविधा देणेबाबत आत्ताच्या घडीची मोठी महत्वपुर्ण अपडेट !

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विधानपरिषद सदस्य श्री.कपिल हरिश्चंद्र पाटिल यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांना राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणाऱ्या सुविधा लागु करणेसंदर्भात पत्र सादर केले आहेत . या संदर्भातील सविस्तर पत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

राज्यात शासकीय , निमशासकीय कर्मचाऱ्यांना 15 किरकोळ रजा , अर्जित रजा , व अन्य सुविधा मिळतात . मात्र प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना 15 किरकोळ रजा आणि अर्जित रजा मिळत नाहीत . ते मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण सदर पत्रकांमध्ये विधानपरिषद आमदार मा. कपिल हरिश्चंद्र पाटील यांनी केले आहे .

त्याचबरोबर स्वातंत्र्य दिन , प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन या सार्वजनिक सुट्ट्या असल्या तरी शिक्षकांना त्यादिवशी शालेय व राष्ट्रीय कार्यक्रम व कर्तव्यामुळे सुट्या घेता येत नाहीत . त्यांना त्याबद्दल्यात भरपाई रजा मंजुर करण्याची आवश्यक आहे . . तसेच अर्जित रजा ही कॅश करणे संदर्भात राज्यातील सर्वच शासकीय / निमशासकीय त्याचबरोबर अनुदानिक शिक्षक यांनाही समान न्याय प्रमाणे लागु असून देखिल शिल्लक रजा ह्या प्राथमिक , माध्यमिक त्याचबरोबर उच्च माध्यमिक शिक्षकांना सदर रजा ह्या कॅश होऊ देत नाहीत .

सरकारी कर्मचारी विषयक , सरकारी पदभरती व मराठी ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटकरीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment