राज्य शासनाने यापुर्वीच बक्षी समितीने सादर करण्यात आलेला खंड – 1 अहवाल स्विकारला असून , सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन त्याचबरोबर इतर लाभ बाबत त्रुटी आढळून आलेल्या तरतुदींमध्ये बदल करण्याच्या हेतुने राज्य शासनाकडुन बक्षी समितीकडुन परत एकदा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते . या बक्षी समिती खंड – 2 मध्ये कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेवूनच अहवाल तयार करण्यात आलेला होता .
ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेण्यांमध्ये बदल / किंवा वेतनावर विपरीत परिणाम झालेला आहे , अशा संवर्गातील कर्मचाऱ्यांकडुन प्रत्यक्ष अपेक्षित बदलाकरीता लेखी मत घेण्यात आले होते . यानुसारच बक्षी समिती खंड दोन तयार करण्यात आलेला आहे . हा खंड – 2 अद्याप पर्यंत राज्य शासनाकडुन प्रसिद्ध करण्यात आलेला नाही . परंतु कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार यामध्ये नेमक्या कोणकोणत्या तरतुदी असू शकतील ते पुढीलप्रमाणे पाहुयात .
वेतनत्रुट्या – राज्य शासन सेवेतील समश्रेणी मध्ये कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना समान वेतन देणे यामध्ये नमुद आहे . म्हणजेच समान पद असूनही वेतनश्रेणींमध्ये बदल आढळून आल्याने कर्मचाऱ्यांकडुन याबाबत आक्षेप नोंदविला आहे . म्हणजेच समान पद / संवर्ग असूनही वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळी वेतनश्रेणी आढळून आल्याने कर्मचाऱ्यांकडुन सबब समान पदांकरीता समान वेतनश्रेणी असाव्यात अशी तरतुद करण्याची मागणी करण्यात आलेली होती .
त्याचबरोबर अतिरिक्त कार्यभार साठी अतिरिक्त वेतनांची तरतुद असते , परंतु सदर अतिरिक्त वेतन हे उचित नसल्याने यामंध्ये बदल करण्याची शिफारस अधिकारी वर्गांनी केलेली आहे .तसेच सारख्या स्त्रोतापासून आलेल्या सारखी अर्हता असलेल्या सारख्या गटातील अधिकाऱ्यांमध्ये वेतनसमानता राखण्याची तरतुद यामध्ये करण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर उपदानातील वाढ , तसेच अर्जित रजा रोखीकरण योजना पुन्हा सुरु करणे इत्यादी तरतुदी यामध्ये करण्यात आलेल्या आहेत . या संदर्भातील कर्मचाऱ्यांकडून शिफारस करण्यात आलेली सविस्तर तरतुदी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना त्याचबरोबर ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !