शासनाचा निर्णय ! राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता थकबाकीची रक्कम रोखीने !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , सेवानिवृत्त कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र असणारे शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांना महागाई भत्ता थकबाकीची रक्कम प्राप्त होणार आहे . चार टक्के डी.ए वाढीबाबत आत्ताची क्षणांतील सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे .

चार टक्के महागाई भत्ता फरकाची रक्कम रोखीने –

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जुलै 2022 ची डी.ए वाढ अद्याप पर्यंत लागु करण्यात आलेली नाही . परंतु कर्मचाऱ्यांना सदरचा वाढीव महागाई भत्ता वाढ जानेवारी 2023 मध्ये लागु होण्याची शक्यता आहे .माहे जुलै 2022 पासुन चार टक्के वाढ म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2022 मध्ये एकुण टक्के 38 टक्के दराने लागु होईल . यामुळे सदर जुलै ते अद्यापर्यंतची डी.ए फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना रोखीन अदा करण्यात येणार आहे .

मिडीया रिपोर्टनुसार राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासुन सदर वरील नमुद कालावधी मधील वाढीव डी.ए वाढ लागु करण्यात येणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील डी.ए फरकाची रक्कम रोखीने देण्यात येईल .

राज्य सरकारी कर्मचारी विषयक , सरकारी भरती व योजनांच्या नियमित अपडेट करिता Whatsapp group मध्ये सामील व्हा

Leave a Comment