Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या या पाच भन्नाट योजनेमध्ये गुंतवणूक करा ! मिळेल जबरदस्त परतावा , अशाप्रकारे गुंतवणूक करा !

Spread the love

अलीकडे गुंतवणूक करण्यासाठी देशभरात अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध झाले आहेत. जर तुम्ही योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगले रिटर्न्स मिळू शकता. आज आपण पोस्ट ऑफिसच्या पाच योजनांबद्दल माहिती घेणार आहोत. त्यामध्ये गुंतवणूक करून तुमची चांगली कमाई होईल.

Post Office Scheme : प्रत्येक नागरिक गुंतवणूक करत असताना विविध योजनांची माहिती घेतो. मात्र पोस्ट ऑफिस मध्ये बिनधास्तपणे तुम्ही गुंतवणूक करू शकता. कारण यामध्ये केली जाणारी गुंतवणूक अगदी सुरक्षित आहे आणि भन्नाट असा परतावा देणारी आहे. पोस्ट ऑफिसच्या ह्या पाच भन्नाट योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

पोस्ट ऑफिस स्वतः आपण केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देते. त्यामुळे अनेक नागरिक पोस्ट ऑफिस च्या योजनेमध्ये गुंतवणूक करतात .

तुम्हाला माहित आहे का पोस्ट ऑफिस ने देशातील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना राबवली आहे. या योजनेमध्ये खाते उघडल्या नंतर आपल्या बचतीवर एकूण 7.6% व्याजदर आपल्याला मिळते. आर्थिक वार्षिक कालखंडात या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेमध्ये कमीत कमी अडीचशे रुपये गुंतवणूक करू शकता याशिवाय कमाल मर्यादा ही दीड लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी.

खाजगी नोकरी किंवा शासकीय नोकरी करत असताना आपल्याला मिळणाऱ्या पगारातील काही रक्कम PFF च्या माध्यमातून कापली जाते. या रकमेवर आपल्याला चांगले व्याज मिळते. सध्या पीएफ वर जवळपास 7.1% व्याजदर मिळत आहे.

वार्षिक आर्थिक कालखंडामध्ये पीएफ च्या खात्यामध्ये जवळपास 500 रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये इतकी गुंतवणूक करू शकतात. पीएफ संदर्भाबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला जे व्याज मिळते त्या व्याजावर करपत्र असते. या माध्यमातून परिपक्वतेवर जी काही रक्कम मिळते ती देखील करमुक्तच असते.

मुदत ठेव योजना

मित्रांनो ही एक योजना आहे या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपण केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक सात टक्के व्याज मिळते. यामध्ये गुंतवणूक केली की तुम्हाला कर सवलत मिळू शकते. यामध्ये केलेली गुंतवणूक ही आर्थिक वार्षिक कालखंडाच्या दीड लाख रुपये पर्यंतच्या कर सवलतीसाठी प्राप्त असणार आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

या योजनेमध्ये साठ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना गुंतवणूक करता येते साठ वर्षे पूर्ण झालेले व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी खाते उघडू शकतात या योजनेवर जेवढी गुंतवणूक कराल त्या गुंतवणुकीवर आठ टक्के दराने तुम्हाला व्याजदर मिळेल ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी दीड लाख रुपये करू शकता या अंतर्गत कलम 80C कर लाभासाठी पात्र असणार आहेत परंतु जे व्याज मिळते ते कर पात्र असणार आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

नागरिकांनो अलीकडे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट आपल्याला सात टक्के व्याज देत आहे. एन एस सी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्यासमोर कोणतीही उच्च मर्यादा नसणार आहे. पण किमान गुंतवणूक म्हणून तुम्ही शंभर रुपयांची गुंतवणूक करायची आहे. एका आर्थिक वर्षामध्ये एन एस सी मध्ये जी काही जमा केलेली रक्कम आहे त्या पैकी दीड लाख रुपयांची रक्कम 80c अंतर्गत कर कपातीसाठी पात्र ठरणार आहे.

Leave a Comment