PM Kisan : देशामधील दहा कोटींपेक्षाही अधिक शेतकऱ्यांसाठी आनंदाची ! बातमी या दिवशी खात्यात जमा होणार 2 हजार रुपयांचा हप्ता !

Spread the love

PM Kisan 13th Installment : देशभरातील दहा कोटींपेक्षाही अधिक शेतकऱ्यांसाठी आम्ही आज एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत. जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये लवकरच 13 वा हप्ता जमा होईल. मीडिया रिपोर्ट कडून मिळालेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीच्या दरम्यानच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच जवळपास दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र शासनातर्फे तेरावा हप्ता जमा केला जाईल. याबाबत असून देखील कोणतेही अधिकृत घोषणा केलेली नाही.

मित्रांनो जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही अजून देखील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये तेराव्या हप्त्याचे पैसे अजिबात येणार नाहीत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याकरिता लवकरात लवकर ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. मित्रांनो शासनाने आपल्या कल्याणासाठी ही योजना राबवली असून या योजनेमध्ये होणाऱ्या फेरफार टाळण्यासाठी हे प्रक्रिया केली आहे. तरी आपण या योजनेला प्रतिसाद देण्याकरिता आणि योजनेचा लाभ घेण्याकरिता प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने चे लाभार्थी ज्यांनी अजून पण ई-केवायसी प्रक्रिया अजिबात पूर्ण केली नाही ते खात्यामध्ये जमा होणारे तेरावे हप्त्यापासून वंचित राहतील. अशा परिस्थितीमध्ये जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर समाज सेवा केंद्र मध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

मित्रांनो आपल्याला हे माहीत असणे गरजेचे आहे की तेरावा हप्ता मिळविण्याकरिता सर्वात प्रथम ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनाने योजनेच्या नियमांमध्ये बदल करत असताना लाभार्थ्यांची खाती Know-Your-Customer (KYC) सोबत लिंक करणे बंधनकारक केले आहे. ज्यांचे अजूनही ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यांच्या खात्यामध्ये पुढे पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

खरे पाहता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करते. दोन-दोन हजार रुपयांची तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जातात. या योजनेच्या माध्यमातून हंगामानुसार खात्यामध्ये पयशे जमा होतात. पहिला हप्ता एक एप्रिल पासून एक जुलै पर्यंत, दुसरा हप्ताह एक ऑगस्ट पासून 30 नोव्हेंबर पर्यंत आणि तिसरा हप्ता एक डिसेंबर पासून 31 मार्च पर्यंत च्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो. आता या महिन्यांमध्येच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील हप्ता जमा होईल.

Leave a Comment