PM Kisan : पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे दुप्पट रक्कम! शासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय !

Spread the love

PM Kisan : शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खुशखबर आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी शासनाने एक सकारात्मक असा निर्णय घेतला आहे.केंद्र शासना अंतर्गत 2015-16 मध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकरिता फक्त 25 हजार 460 कोटी रुपयांचे बजेट ला मान्यता दिली होती. पण आता यामध्ये पाच पटीने वाढ करण्यात आली असून 2022-23 मध्ये हेच बजेट 1 लाख 38 हजार 550 कोटी रुपये इतके करण्यात आले आहे.

पीएम किसानच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ..

शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी यासाठी पीएम किसान च्या माध्यमातून 2019 च्या अर्थसंकल्पना अर्थमंत्री अंतर्गत पी एम किसान योजना राबवली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. त्यामध्ये दोन हजार रुपयांचे तीन हप्ते हंगामा नुसार दिले जातात. आतापर्यंतचा आकडा बघितला तर 11 कोटी पात्र शेतकरी वर्गाला जवळपास दोन लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)…

मित्रांनो यासोबतच शासनाच्या पीएम फसल विमा योजनेचाही शेतकरी वर्गाला चांगला फायदा होत आहे. पीएम फसल विमा योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत केली जाते. मागील सहा वर्षांमध्ये 38 कोटी शेतकऱ्यांची नोंद यामध्ये झाली असून 11 कोटी शेतकऱ्यांचे दावे प्राप्त झाले आहेत.

ह्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रीमियम चा हिस्सा जवळपास 25 हजार 185 कोटी रुपये इतका दिला होता ज्यासाठी त्यांना 1 लाख 24 हजार 200 कोटी रुपये पेक्षाही अधिक रक्कम अदा करण्यात आलेली होती. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी जो प्रीमियम भरला होता त्या शंभर रुपयाच्या प्रीमियम वर त्यांना 493 रुपये दावे म्हणून देण्यात आले.

शेतकऱ्याचे उत्पादन वाढवण्याकरिता शासनाने महत्त्वाच्या सात घटकांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. ज्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली…

१) शेतकऱ्यांच्या पीक उत्पादकतेत वाढ…
२) शेतकऱ्यांच्या पशु धन उत्पादकतेमध्ये वाढ…
३) संसाधनाच्या वापरामध्ये पूर्णपणे कार्यक्षमता आणि उत्पादन खर्च मध्ये घट…
४) पिकांच्या तीव्रतेमध्ये वाढ…
५) चे मूल्याच्या अधिकृत शेतीकडे विधी करण…
६) शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य तो भाव देणे…
७) अतिरिक्त श्रम शेतीच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीकडे वळणे…

Leave a Comment