आता नविन नियमानुसार , सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने एक मोठा धक्का दिलेला आहे . तो म्हणजे दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्याचे निवृत्तीवेतन व ग्रॅच्युइटी रोखण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .या नियमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आणखीण एक मोठा धक्का बसला आहे .
केंद्र सरकाने केलेला हा सुधारित नियम राज्य सरकारही बदल करण्याच्या तयारीत आहेत . यामध्ये नमुद करण्यात आलेले आहे कि , कामामध्ये हलगर्जीपणा केला असेल व संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार झाली असल्यास सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांची पेन्शन व ग्रॅच्युइटी बंद होणार आहे .यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना कामामध्ये हलगर्जीपणा करता येणार नाही .
केंद्र सरकारने केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 बाबत अधिसूचित करुन CCS ( Pension ) नियम 2021 च्या नियम 8 मध्ये बदल करण्यात आले आहे .यानुसार आता कर्मचारी सेवाकाळामध्ये गंभीर गुन्हा अथवा निष्काळजीपणा करण्यामध्ये दोषी आढळून आल्यास त्या कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीनंतर पेन्शन / ग्रॅच्युइटी बंद करण्यात येईल .
नविन नियमानुसार कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी , न्यायालयीन चौकशी , कारवाई प्रलंबित असल्यास त्याची माहीती संबंधित विभागाला देणे आवश्यक आहे . या प्रकरणांमध्ये कर्मचारी हा दोषी आढळून आल्यास , त्याची पेन्शन आणि ग्रॅच्युईटी अदा केली जाणार नाही .सदर प्रकरणांवर कारवाई करण्याचा अधिकार हा संबंधित कार्यालय प्रमुखास असणार आहे .
सरकारी कर्मचारी विषयक / पदभरती योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !