जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी कसली कंबली ! सरकारला जुनी पेन्शन लागु करावीच लागणार !

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील शासकीय , जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना मिळावी याकरीता विविध पर्याय करुन पाहीले परंतु राज्य सरकारवर कोणताच परिणाम होत नसल्याने , खुद्द राज्य कर्मचारीच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत . यामुळे राज्यातील जे पक्ष जुनी पेन्शनच्या विरोधात आहेत अशा पक्षातील उमेदवारांना निवडणुकींमध्ये मोठा फटका बसणार आहे .

राज्य सरकार जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर सकारात्मक भुमिका घेत नसल्याने येत्या शिक्षक मतदान निवडणुकींच्या रिंगणामध्ये उमेदवारांना पाठिंबा देण्याचे कर्मचाऱ्यांनी ठरविले आहे , जेणेकरुन कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनबद्दल वाचा विधानसभेत फोडले जाईल व लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागु होईल .

सदर शिक्षक निवडणुकींमध्ये राज्यात एकुण सात जागेवर निवडणुका जाहीर करण्यात आलेले असुन श्री.अडबाले सुधाकर गोविंदराव हे नागपुर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चे पुरस्कृत उमेदवार म्हणुन घोषित करण्यात आलेले आहेत . त्याचबरोबर राज्यातील सात जागांवरील उमेदवारांपैकी जे उमेदवार जुनी पेन्शन योजनेला पाठिंबा देतील अशा उमेदवारांस संघटनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा देण्यात येतील .

या संदर्भातील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने जाहीर प्रसिद्धपत्रक काढुन जाहीर केले आहे कि , श्री.अडबाले सुधाकर गोविंदराव हे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांना पसंती क्र.01 चे मतदान करुन प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन संघटनेमार्फत करण्यात आलेले आहेत .

सरकारी कर्मचारी विषयक भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेट करीता जॉइन करा , Whatsapp ग्रुप .

Leave a Comment