कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागु करणेबाबत , हायकोर्टाने दिले सरकारला ओदश !

Spread the love

सध्या जुनी पेन्शन योजनाबाबत देशातील अनेक उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयांमध्ये अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत . यापैकी देशातील निमलष्करी दलांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना बाबत दिल्ली हायकोर्टाने मोठा दिलासादायक निर्णय दिलेला आहे . या संदर्भातील सविस्तर वृत्त खालील प्रमाणे पाहुयात ..

देशांमध्ये सध्या सैन्य दलांमधीलच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु आहे . परंतु निमलष्करी दलांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु रद्द करण्यात आलेली होती . कोर्टाने केंद्रीय अर्थ मंत्रालयाची 2003 ची अधिसुचना त्याचबरोबर पेन्शन व पेन्शनधारक कल्याण विभागाचे 2020 चे ऑफीसियल पत्र फेटाळले आहेत . सदर पत्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , 01 जानेवारी 2003 नंतर निमलष्करी दलांमध्ये रुजु होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करुन राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात येईल .

निमलष्करी दल हे सशस्त्र दलांचेच भाग असल्याचे दिल्ली उच्च न्यायालने स्पष्ट केल्याने , अर्थ मंत्रालयाचे सदरचे ऑफीसियल पत्र दिल्ली हायकोर्टाने फेटाळले असून  , देशातील निमलष्करी दलांमध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागु करण्यात येणार आहे .या निर्णयामुळे निमलष्करी दलांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना तब्बल 20 वर्षांनंतर परत जुनी पेन्शन योजनेचा लाभ पुर्ववत करण्यात येणार आहे .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती प्रक्रिया / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment