Old Pension : जुनी पेन्शनसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे आता बेमुदत संपाचे आयोजन !

Spread the love

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनामार्फत राज्य कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आलेले असून , सदर बैठकीमध्ये जुनी पेन्शन मागणीकरीता बेमुदत संपाचे आयोजन करण्यात येणार आहे .याबाबत संघटनेकडुन अत्यंत महत्वपुर्ण पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

जुनी पेन्शन योजना मागणीसाठी सदर संघटनेकडून बैठक आयोजित करण्यात येणार असून यामध्ये बेमूदत संपाचा निर्णय घेण्यात येणार आहे . संप आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी राजय स्तरावरील महत्वाची जिल्हानिहाय आखणी करण्यात येणार आहे . तसेच जिल्ह्यात पुरेशी सभासद संख्या असेलच याची खातरजमा करण्यात येणार आहे . त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकारीणीने बेमुदत संप करावा या आशयाचा ठराव सदर राज्य कार्यकारीणी सभेमध्ये करण्यात येणार आहे .

तसेच बेमुदत संप आंदोलनाची तारीख निश्चित करुन शासनाला द्यावयाच्या नोटीसचा दिनांक सदर बैठकीमध्ये ठरविण्यात येणार आहे .जुनी पेन्शनची मागणी राज्य सरकारला मान्यच करावी लागेल अशा दृष्टीने संपाची तयारी करुन राज्य सरकारची कोंडी करुन आपली मागणी पुर्ण करण्याचा संघटनेचा मानस आहे .या संदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य कार्यकारीणीची महत्वाची सभा दि.12.02.2023 रोजी नाशिक येथील सेवा प्रबोधनिी सभागृहात सकाळी ठिक 10.30 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे .

सदर बैठकीस राज्यातील सर्व पदाधिकारी / जिल्हा अध्यक्ष – सरचिटणीस यांना सदर सभेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहेत .

सरकारी कर्मचारी विषयक , शासकीय पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Comment