बापरे ! शेअर मार्केटमधील चढ – उतारामुळे NPS धारकांचे चक्क 1600 कोटी रुपये बुडाले !

Spread the love

केंद्र व राज्य शासन सेवेत 2004 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या शासकीय / निमशासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडुन राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आलेली होती . या योजनेचा स्विकार पश्चिम बंगाल हे राज्य सोडून देशातील सर्व राज्यांनी केला होता , महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभेत विधेयक पारित करुन सन 2005 मध्ये राज्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना ( National Pansion System )  लागु करण्यात आहे .

NPS मधील कर्मचाऱ्यांचे जमा रक्कमेपैकी 1600 कोटी रुपये बुडण्याच्या मार्गावर –

शेअर बाजारामधील चढ – उतार व NSDL कंपनीच्या भागभांडवलीचे होणारे विपरित परिणाम यामुळे NPS धारक कर्मचाऱ्यांचे तब्बल 1600 कोटी रुपये बुडण्याच्या मार्गावर आहेत . मागील कोरोनाच्या काळापासुन NPS धारकांना जमा रक्कमेवर वजा ( मायनस ) परतावा मिळत आहे .यामुळे कर्मचाऱ्यांचे जमा रक्कमेवर व्याज / लाभ न मिळत लाभ हा वजा मध्ये मिळत आहे . म्हणजेच कर्मचाऱ्यांना मोठा नुकसान सहन करावा लागत आहे .

जुनी पेन्शनच कर्मचाऱ्यांची उतारवयाची काठी –

सरकारी कर्मचारी हे आयुष्यभर देशसेवा करत असतात , अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ मिळत नाही . परंतु आपल्या देशांमध्ये केवळ पाच वर्षांकरीता निवडुन आलेल्या आमदार / खासदार यांना मात्र मोठ्या रक्कमेमध्ये पेन्शन लाभ मिळतो .म्हणजेच आमदार /खासदार यांनी आपली पेन्शन जुन्या पेन्शनप्रमाणेच कायम ठेवली आहे , परंतु कर्मचाऱ्यांना मात्र नविन पेन्शनप्रमाणे तुटपंजी पेन्शन लागु केली आहे .यामुळे जुनी पेन्शन ( Old Pensioin ) हीच कर्मचाऱ्यांच्या उतारवयाची काठी असणार आहे .

कर्मचारी विषयक / भरती तसेच शासकीय योजनांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp group मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment