NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! कर्मचाऱ्यांचे 8 लाख कोटींचे नुकसान !

Spread the love

हिंडेनबर्ग या अमेरिकन इन्व्हेस्टर संशोधन संस्थाने परवाच्या दिवशी भारत देशातील अदानी उद्योग समूहाच्या संबंधातला एक अहवाल प्रकाशित केला आहे .या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दर्शवित आहेत .या समूहाच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली असल्याने सुमारे 4 लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काल शेअर बाजारात झालेली उलथापालथमुळे प्रख्यात अर्थविषयक दैनिकांनी ब्लॅक फ्रायडे असे या दिवसाचे वर्णन केले आहेत .

अदानींवर मेहरनजर दाखवण्यासाठी LIC ,SBI तसेच अन्य सरकारी बँकांचा पैसा अदानी समूहातील कडे वळवण्यात आलेला आहे  , त्यांच्या पैशालाही धोका असल्याचे तज्ञाने चिंता व्यक्त केले आहेत . लाईफ इन्सुरन्स कार्पोरेश कंपनीचे तब्बल ७४ हजार कोटी रुपये अदानी समूहात अडकले आहेत .अदानी उद्योगावर आज जे कर्ज आहे त्यातील तब्बल ४० टक्के कर्ज स्टेट बँकेचे असल्याने , भारतीय स्टेट बँकेत भारतीयांचे मोठ्या प्रमाणात बचती असल्याने चिंतेचा विषय ठरला आहे

केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांना लागु असणारी राष्ट्रीय पेन्शन योजना मधील पैसे हे सरकारी कंपनीच्या फंडामध्ये जसे कि LIC व SBI अशा दोन मुख्य फंडामध्ये गुंतवणुक आहे .यामुळेच सरकारकडुन जे 14 टक्के योगदान देण्यात येते , ते याकरीतचा देण्यात येते .राष्ट्रीय पेन्शन योजनेमधील कर्मचाऱ्यांचे योगदान जरी कर्मचारी करत असला तरी त्या फंडाची रक्कम ही फंड मॅनेजर ठरवत असतो , कि कोणत्या शेअर मध्ये गुंतवणुक / कोठे गुंतवणुक करायची यामुळे कर्मचाऱ्यांचा पैसा हा किती सुरक्षित आहे यावर प्रश्नचिन्ह आहे .

सध्या शेअर बाजारामधील उलथापालथ मुळे कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेतील गुंतवणुकी पैकी 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहेत .यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Comment