शेवटी झालेच पुढील दोन दिवस महाराष्ट्र अंधारात , महावितरण कडुन गाइडलाईन जाहीर !

Spread the love

महावितरण कंपनी मधील कर्मचारी आजपासून संपामध्ये सहभाग घेतले असून , राज्यांमध्ये पुर्णत : वीज खंडीत करण्यात आलेली नाही . परंतु शेवटी जे व्हायचे तेच झाले . ज्या भागांमध्ये महावितरण कंपनी कडुन रोजंदारी / सेवानिवृत्त कर्मचारी यांची नेमणुक सध्या केलेली नाही . अशा ठिकाणी विजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे .

कारण काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या असुन अशा ठिकाणी कर्मचारी उपलब्ध नसल्या कारणाने तसेच कुशल कामगारांची उपलब्धता नसल्याने वीजपुरवठा खंडीत झालेला आहे .ग्रामीण भागांमध्ये तर आज सकाळ पासुनच विजपुरवठा खंडीत झालेला आहे .यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे .शिवाय ग्रामीण उद्योग धंद्यावर देखिल मोठा विपरित परिणाम झालेला आहे .

राज्य शासनाकडुन देखिल अद्याप कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक निर्णय न झाल्याने कर्मचारी संप पुढे चालुच ठेवणार असल्याने , नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे .शहरी भागांमध्ये अद्याप पर्यंत विजपुरवठा सुरुळीत चालुच आहे .परंतु ग्रामीण भागातील विजपुरवठा सकाळपासुनच बत्तीगुल झाल्याने , लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे .
वीज पुढील 24 तासांमध्ये सुरळीत सुरु न झाल्यास राज्यातील आर्थिक चक्रावर मोठा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे .

Leave a Comment