महागाई भत्ता मध्ये 4 % नव्हे तर तब्बल 9% वाढ ! राज्य शासनाचा आजचा मोठा शासन निर्णय !

Spread the love

राज्य शासन सेवेत असुधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01 जुलै 2022 पासुन सुधारणा करणेबाबतचा राज्या शासनाच्या वित्त विभागांकडुन शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . असुधारित वेतन श्रेणींमध्ये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना चक्क 9 टक्के डी.ए वाढ मिळालेली आहे .

राज्य शासन सेवेतील असुधारित वेतनश्रेणींमध्ये वेतन घेणाऱ्या शासकीय तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना मुळ वेतन / पेन्शन वरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 203 टक्के वरुन 212 टक्के करण्यात आलेला आहे . सदर महागाई भत्ताचा वाढ ही दि.01 जुलै 2022 ते दिनांक 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील थकबाकीसह माहे जानेवारी 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

सदरचा वाढीव महागाई भत्ता हा राज्यातील असुधारित वेतन श्रेणींमध्ये म्हणजेच सहाव्या वेतन श्रेणीमध्ये वेतन घेणारे कर्मचारी यांना अनुज्ञेय होणार असून राज्यातील विविध महामंडळामधील कर्मचाऱ्यांना असुधारित सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्यात येते . अशा कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय डी.ए मध्ये 9 टक्के वाढ करण्यात आलेली आहे .

सरकारी कर्मचारी विषयक , भरती त्याचबरोबर योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment