Business Idea : कमी भांडवलात जास्त कमाई करून देणारा हा व्यवसाय सुरू करा! जाणून घ्या व्यवसाय बद्दल संपूर्ण माहिती !

Spread the love

तुम्ही आता कोठेही म्हणजेच शहरांमध्ये किंवा गावांमध्ये राहून अगदी कमी खर्चामध्ये जास्त नफा देणारा म्हणजेच जास्त पैसे मिळवून देणारा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी जास्त कामगारांची मदत देखील भासणार नाही.

Business Idea : अलीकडे बघितले तर अनेक दिग्गज कंपन्या आपल्या कामगारांना घरचा रस्ता दाखवत आहेत. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पण अशा नागरिकांपुढे व्यवसायाची संधी उभा राहिली आहे. अनेकांना कमी खर्चामध्ये जास्त पैसे मिळवून देणारा व्यवसाय सुरू करायचा असतो. याबाबतची कोणतीही माहिती त्या नागरिकांना नसते. तुम्ही जर अशा व्यवसायाच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचावा आणि आपल्या व्यावसायिक मित्रांपर्यंत शेअर करावा.

तुम्ही तुमच्या गावांमध्ये किंवा तुम्ही राहत असाल त्या ठिकाणी कोठेही मोहरीच्या तेलाची गिरण चालू करू शकता. या माध्यमातून सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अनुभवाची किंवा प्रशिक्षणाची गरज पडत नाही. यासोबतच जास्त पैसे देखील खर्च करावे लागत नाही. पण हा व्यवसाय सुरू करून तुम्ही महिना चांगली कमाई करू शकाल.

पूर्वी मोहरीचे तेल काढण्यासाठी सर्वात मोठ्या यंत्राची गरज भासत होती. पण आता लहान मशीन विकसित झाले आहे. ज्याची किंमत कमी आहे आणि ती मशीन ठेवण्यासाठी जास्त जागाही लागत नाही. तसेच चालवण्यासाठी जास्त कष्ट देखील लागत नाही.

हा व्यवसाय सुरू करण्याकरिता सर्वात आधी तुम्हाला ऑइल एक्सेलर खरेदी करावे लागेल. ज्याची किंमत फक्त दोन लाख रुपये असून त्याच्या उभारणी करिता एफ एस एस ए आय कडून परवाना घ्यावा लागतो. याबाबतची नोंदणी करावी.

जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर तो बेकायदेशीरपणा म्हणून तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया उभा करण्यासाठी कायदेशीरपणे परवानगी घेऊन सेटअप उभा करावा. सेटअप उभा करण्यासाठी तीन ते चार लाख रुपये खर्च येईल. या यंत्राच्या माध्यमातून बिया मधून तेल काढले जाते. यामध्ये तेल वेगळे होते आणि साल वेगळे होते. तुम्ही तेल विकून आणि साल विकून पैसे कमवू शकता.

किती असणार उत्पन्न!

तेलाची विक्री करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन मार्केटिंगचा देखील उपयोग करू शकता. हे तेल टिन किंवा बाटल्यांमध्ये देखील पॅक करता येते. हा व्यवसाय फक्त एकदा केलेल्या गुंतवणुकीत उभा राहू शकतो. यानंतर तुम्ही चांगले पैसे या व्यवसायामधून मिळू शकतात. विशेष गोष्ट सांगायची झाली तर. ह्या व्यवसायामध्ये नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी असते.

Leave a Comment