राज्यातील नागरीकांना मोठी खुशखबर : विजबिल सरसकट माफीबाबत सरकारने घेतला निर्णय ! असा करावा लागेल अर्ज !

Spread the love

मागील काही दिवसांपासून महावितरण व शेतकरी यांच्यामध्ये मोठ मोठे वादविवाद सुरू आहेत. सध्या महावितरण कडे शेतकऱ्यांची मोठी थकबाकी शिल्लक राहिली असून पुणे प्रादेशिक विभागातील कृषी पंप ग्राहकांची जी काही थकबाकी असेल ती दिवसेंदिवस वाढत आहे.

यामुळे आता महावितरण कडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. जेणेकरून शेतकरी त्यांची थकबाकी पूर्ण करू शकतील. त्यामध्ये आता थकबाकी वसुली करण्यासाठी राज्य शासनाने नवीन कृषी पंप धोरण तयार केले आहे. या माध्यमातून जे शेतकरी 31 मार्च 2023 पर्यंत त्यांची थकबाकी भरतील त्यांच्या रकमेवर 30 टक्के सूट देण्यात येणार.

यामुळे आता ही एक सुवर्णसंधी शेतकऱ्यांपुढे आहे यासोबतच आता विलंब आकार आणि व्यास माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पैसे भरण्यास काहीच हरकत नाही असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे प्रादेशिक विभागाच्या माध्यमातून संचालक अंकुश नाळे यांनी याबाबत सगळी माहिती दिली.

2022 च्या डिसेंबर अखेरपर्यंत महावितरण पुणे प्रादेशिक विभागाच्या कृषी पंप वीज ग्राहकांची एकूण थकबाकी बघितली तर तुम्ही थकवाल त्यांची थकबाकी 1261 कोटी इतकी झाली होती. त्या शेतकऱ्यांना आता जानेवारी 2021 पासून मार्च 2022 पर्यंतच्या थकबाकी वर 25 टक्के सूट देण्यात आले आहे.

एप्रिल 2022 पासून 31 मार्च 2023 पर्यंतच्या कालखंडामध्ये जी काही थकबाकी राहिली होती त्या थकबाकी वर तीस टक्के सूट देण्यात येणार असून विलंब आकार व व्यास पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे आणि याचमुळेच शेतकऱ्यांना महावितरण ने दिलासादायक बातमी दिलेली आहे. आता पुढील पाऊल शेतकऱ्यांचे आहे.

Leave a Comment