शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना सातत्याने राबवल्या जात आहेत. यामध्ये आता केंद्र शासनाने व राज्य शासनाने एक महत्त्वकांक्षी योजना सर्वत्र राबविली आहे. त्या योजनेचे नाव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. शासनाने राबवलेल्या या योजनेच्या माध्यमातून मुलींना 50 हजार रुपये दिले जातात.
या योजनेच्या माध्यमातून पालकांना आपल्या मुलीचा जन्म झाल्यानंतर ज्यावेळी मुलीला अठरा वर्षे पूर्ण होतील त्यावेळी 50 हजार रुपये मिळतील. शासनच हे पन्नास हजार रुपये मुलींना किंवा मुलींच्या पालकांना देणार असून जर एखाद्या पालकाला दोन मुली असतील तरी या योजनेअंतर्गत दोन्ही मुलींना योजनेचा लाभ मिळेल.
फक्त राज्य शासनाने राबविलेल्या या योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्याकरिता पालक आणि मुली ह्या महाराष्ट्रातील रहिवासी असाव्यात. या योजनेच्या माध्यमातून आईच्या व मुलीच्या नावाने एक संयुक्त बँक खाते उघडण्यात येईल त्यामध्येच हे पैसे जमा केले जातील.
या योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपयांचा अपघात विमा पॉलिसी जमा केली जाईल. यासोबतच पाच हजार रुपये ओव्हरड्राफ्ट म्हणून जमा केली जातील. जर दोन मुली असल्यास प्रत्येक मुलीस पंचवीस हजार रुपये याप्रमाणे योजनेच्या माध्यमातून पैसे मिळतील माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून शासनाने जो पैसा दिलेला आहे.
या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला चांगला हातभार लागणार आहे. या योजनेचा लाभ घेणे करिता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योजनेबद्दल संपूर्ण माहिती घ्यावी व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यावा आणि योजनेचा लाभ घ्यावा.
सर्वात प्रथम माझी कन्या भाग्यश्री योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा. तो शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज डाऊनलोड करून झाल्यानंतर तो व्यवस्थितपणे भरून घ्यावा आणि महिला व बालविकास कार्यालयामध्ये पाठवावा अर्ज भरत असताना अर्ज सोबत महत्त्वाची कागदपत्रे विचारलेले आहेत ते देखील सोडावीत.
अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःच्या आधार कार्ड असावे. आईचे किंवा मुलीचे बँक खाते असावे. यासोबतच आधार कार्ड ची लिंक केलेला मोबाईल नंबर असावा. पासपोर्ट साईजचे दोन फोटो घ्यावेत. रहिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला घेऊन अर्जासोबत ही कागदपत्रे जोडावीत आणि सादर कागदपत्रांसोबत हा अर्ज जमा करावा.
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !