सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर ! महागाई भत्ता मध्ये आणखीन 3% वाढीवर शिक्कामोर्तब ! अर्थसंकल्पात निधीची तरतूद !

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे , ती म्हणजे कर्मचाऱ्यांनाच्या पगारात आणखीन 3% DA वाढ होणार आहे .याकरीता आवश्यक अतिरिक्त निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली जाणार आहे .महागाई भत्ता वाढ संदर्भात आत्ताची सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेवूयात ..

महागाई भत्ता मध्ये 3% वाढ –

केंद्रीय कामगार मंत्रालयाने AICPI चे निर्देशांकांचे आकडेवारी जाहीर केले आहेत .या आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीन 3% वाढ निश्चित करण्यात आलेली आहे , या वाढीमुळे लागणाऱ्या आवश्यक निधीची तरतूद दि.01 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे .सदर महागाई भत्ता वाढीवर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब करण्यात आलेला असून , अर्थसंकल्पात सकारात्मक निर्णय होईल .

एकूण महागाई भत्ता होणार 41%

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3% DA वाढ लागू झाल्यास , केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण 41% दराने महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळेल ,सध्या 38% दराने DA मिळतो .सदरचा वाढीव डी.ए माहे जानेवारी 2023 पासून प्रत्यक्ष रोखीने महागाई भत्ता फरकासह लागू करण्यात येईल .

या वाढीव महागाई भत्ताचा लाभ सर्व केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येईल DA वाढीमुळे वेतन / पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .

सरकारी कर्मचारी विषयक ( Employee ) ,पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करिता Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment