Google : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून जगात मानला जातो. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित असल्याने आपल्याकडे शेतीला अनन्यसाधारण असे महत्त्व देखील दिले जाते. दरम्यान आता शेती या व्यवसायात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा समावेश होऊ लागला असून त्यात नवीन संशोधने झाली आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी बांधव हे शेती व शेतीपूरक व्यवसायातून अधिकच नफा मिळवत आहेत.
यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान देखील सुधारत आहे. मात्र असे असले तरी पण अजूनही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा आपल्या देशात तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. यासाठी शासनाकडून भरपूर प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. काही सामाजिक संस्था तसेच शेतकरी संघटना या शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाबाबत माहिती अवगत करत आहेत.
तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा देखील मोठा प्रभाव पडत आहे. सर्वच स्तरावरून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न होत असतानाच गुगलकडून एक मनाला दिलासा देणारी चांगली बातमी आली आहे. गुगल कृषी क्षेत्रात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी तब्बल दहा लाख डॉलर्सचे अनुदान उपलब्ध करून देणार आहे.
यामुळे शेती व्यवसायाचे रूपच बदलणार आहे. या अनुदानाच्या जोरावर कृत्रिम तंत्रज्ञानाचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर वाढणार असून यामुळे शेतकरी बांधवांना हवामानाची तसेच शेती बद्दल अचूक अशी माहिती ही अगदी कमी वेळात आणि घरी बसला मिळणार आहे.आम्ही आपणास सांगू इच्छितो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराने हवामान कधी चांगले राहील, कधी खराब राहील तसेच पिकाबाबत आणि शेतीशी निगडित इतर महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी दिली जाणार आहे. यामुळे शेती करने हे खूप सोयीचे ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ देखील होणार आहे.
हवामानात होत असलेल्या बदलामुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान होते ते यामुळे खूप कमी होणार आहे. दरम्यान या आधी देखील गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी 2019 मध्ये वीस लाख डॉलरची मदत केली होती. आता नव्याने दहा लाख डॉलर दिले असल्याने याचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कृषी क्षेत्रात वापर वाढवण्यासाठी खूप फायदा होईल, साहजिकच यामुळे शेतीला आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे तरी काय तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आर्टिफिशल इंटेलिजेंस म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मशीनला माहिती समजणे, त्याचं विश्लेषण करणे आणि अनुमान काढणे सोपे होईल.
त्यामुळं शेती क्षेत्राला याचा भरपूर फायदा होणार आहे आणि शेतकरी बांधवांना शेती करताना सर्वाधिक निसर्गाचा लहरीपणाचा फटका बसतो तर कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी, कधी दुष्काळ यांसारख्या विविध अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. मात्र या हवामानात होणाऱ्या बदलाची शेतकऱ्यांना आधीच माहिती मिळाली तर त्यांना योग्य त्या उपाययोजना आधीच करता येणे शक्य होईल.म्हणजेच हवामानाची अगोदरच शेतकऱ्यांना जर अचूक माहिती मिळाली तर शेतकऱ्यांना शेतीतून अधिक उत्पादन मिळवता येईल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कामात मोठी मदत करणार आहे. यामुळे गुगलचे हे अनुदान शेती व्यवसायाचे रूप बदलण्यासाठी कारगर सिद्ध देखील होणार आहे.
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !