Gas Cylinder Price : नवीन वर्षामध्ये सर्वसामान्यांना मोठा धक्का ! गॅस सिलिंडरच्या किमतीत इतक्या रुपयांनी वाढ झाली !

Spread the love

LPG Price Today : नवीन वर्षामध्ये आता सर्वसामान्य व्यक्तींना एक मोठा धक्का बसला आहे. आता गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये एक जानेवारी 2023 पासून वाढ झाली आहे. आता सिलेंडर घेणे महाग ठरत आहे. गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये प्रति सिलेंडर माहिती कमीत कमी 25 रुपयांची वाढ झाली आहे. भारत देशातील संपूर्ण शहरांमध्ये आणि सर्वत्र गॅस सिलेंडर भाग झाले असून मोठ्या शहराप्रमाणे सिलेंडरचे दर किती आहे ते बघूया…

कोणता सिलेंडर महागला?

मित्रांनो एक जानेवारीपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये देखील चांगलीच वाढ झाली आहे. त्यासोबत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती या नेहमीप्रमाणे कायमच आहेत. म्हणजेच घरगुती गॅस सिलिंडर साठी मागील महिन्यामध्ये तुम्ही जितके पैसे दिले आहेत. तितकेच पैसे द्यावे लागतील पण व्यवसायिक सिलेंडर साठी 25 रुपये जास्त खर्च येणार आहे.

व्यावसायिक सिलिंडरचे दर

१) दिल्ली – 1769
२) मुंबई – 1721
३) कोलकाता – 1870
४) चेन्नई – 1917

घरगुती सिलिंडरचे दर

१) दिल्ली – 1053
२) मुंबई – 1052.5
३) कोलकाता – 1079
४) चेन्नई – 1068.5

मागील वर्षांमध्ये सिलेंडर हा 153.5 रुपयांनी महाग झालेला होता. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बघितले तर शेवटचा बदल हा 14.2 किलो सिलेंडर हा सहा जुलै रोजी करण्यात आलेला होता. गेल्या वर्षभरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 153.5 रुपयांनी वाढ झाली आहे.

सिलिंडर किती वेळा महाग झाला होता…

मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पन्नास रुपयांनी चांगलीच वाढ झाली होती नंतर मे महिन्यामध्ये आणखी पन्नास रुपयांची वाढ झाली. त्यासोबत मे महिन्यामध्ये दुसऱ्यांदा 3.50 रुपयांनी वाढ केली आणि शेवटी जुलैमध्ये आणखी पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आली होती…

Leave a Comment