LPG Cylinder : फक्त पाचशे रुपयात सरकार देणार गॅस सिलेंडर! मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा !

Spread the love

LPG Cylinder : मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? “एलपीजी गॅस सिलेंडर आता फक्त 500 रुपयात नागरिकांना देण्यात येईल” अशी घोषणा अशोक गहलोत यांनी केलेली आहे. आता सरकार उज्वला योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी नाव नोंदवून सिलेंडर घेतले आहे आणि ते नागरिक दारिद्र्यरेषेखालील असतील त्यांना राजस्थान सरकार फक्त पाचशे रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर देईल. अशी मोठी घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सभेमध्ये केली आहे.

दारिद्र्यरेषेखालील जे नागरिक असतील त्यांना संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त पाचशे रुपयात एक सिलेंडर असे 12 सिलेंडर देण्यात येतील. या सोबतच सर्व नागरिकांना रसोई कीट मध्ये स्वयंपाक घरातील संसाधने देखील देण्यात येतील. अशी मोठी घोषणा त्याचवेळी करण्यात आली. या घोषणाच्या वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी घोषणा करत असताना असे सांगितले आहे की शासनांतर्गत ही नवीन योजना आता येणाऱ्या 1 एप्रिल 2023 पासूनच लागू करण्यात येणार असून राजस्थान मधील जनता महागाईच्या संकटातून बाहेर पडेल. सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठीच आम्ही शासनांतर्गत ही योजना राबवणार आहोत.

ज्यावेळी शासन ही नवीन योजना राबवेल या योजनेच्या माध्यमातून जे नागरिक दारिद्र रेषेखालील आहेत आणि उज्वला योजने मधून त्यांनी नोंद केली आहे अशा नागरिकांना फक्त आणि फक्त पाचशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जातील. या योजनेच्या माध्यमातून वार्षिक बारा सिलेंडर पाचशे रुपये प्रमाणे देण्यात येतील. गरीब आणि गरजू नागरिकांना या शासकीय योजनेमध्ये पूर्णपणे सामावून घेण्याचे सरकारचे प्रयत्न चालू आहेत.

Leave a Comment