केंद्र शासनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना म्हणजेच रेशन कार्ड धारकाला 35 किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय जानेवारी 2023 पासून डिसेंबर अखेर 2023 पर्यंत घेण्यात आला आहे. जवळपास 30 लाख लाभार्थी नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून डिसेंबर 2023 पर्यंत लाभार्थी व्यक्तींना मोफत धान्य देण्यात येणारा असून मोफत धान्य वितरणावर रेशन दुकानदारांना नक्की कमिशन किती असणार आहे व कधी मिळणार आहे याबाबत अजून काही स्पष्ट केले नाही. त्यामुळे सध्या रेशन दुकानदार संभ्रमात आहेत. या सोबतच दुकानदाराचे भाडे असते वीज बिल असते मापाडी असतात कर्मचारी असतात त्यांचा पगार व इतर खर्च भागवताना दुकानदारांना सध्या नाकीनऊ येत आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 2023 जानेवारीपासून रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वाटण्याचा निर्णय स्वतः केंद्र शासनाने घेतला असून या निर्णयाचे जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे. आता यानुसारच रेशन कार्डधारकांना दर महिन्याला 35 किलो धान्य मोफत दिले जाईल.
गोरगरीब जनतेला 35 किलो धान्य मोफत पणे देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून जानेवारी 2023 पासून ते डिसेंबर अखेर पर्यंत मोफत देण्याचे वाटप केले जाईल. याचा लाभ जिल्ह्यामधील जवळपास 30 लाख लाभार्थी व्यक्तींना होणार आहे.
कमिशन नाही, तर पोट कसे भरणार ?
रेशन दुकानदारांना आता धान्य वाटल्यानंतर प्रतिक्विंटल मागे नक्की किती कमिशन मिळेल याबाबत आता प्रश्न पडला आहे. आता मोफत धान्य वितरित करण्यात येणार असून शासनाच्या माध्यमातून हे कमिशन दुकानदारांना अदा करण्यात येणार आहे. मात्र दुकानदारांना हे कमिशन किती वितरित केले जाईल व कधी वितरित केले याबाबत अजून स्पष्टपणे सांगण्यात आले नाही.
रेशन दुकानदाराची अनेक दुकान भाड्याच्या जागेवर आहे त्यामुळे त्या जागेची भाडे असेल वीज बिल असेल मापाडी कर्मचारी असतील त्यांच्या पगार कसा भागवायचा हा मोठा प्रश्न दुकानदारासमोर उभा राहिलेला आहे.
जिल्ह्यात 1882 रेशन दुकाने
फक्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 1882 रेशन दुकानदार आहेत. यामधील काही दुकाने स्वतः बचत गटामार्फत चालविण्यात येत असून काही लोकांनी सहकारी संस्था चालवत आहेत काय दुकाने खाजगी व्यक्ती चालवत आहेत. यातील सहकारी संस्थांना दुकाने चालवताना कोणती अडचण येत नाही. मात्र बचत गटामधील नागरिकांना वैयक्तिक पातळीवर जर रेशन दुकान चालवायचे म्हटले तर अडचणी येत आहेत.
रेशन दुकानदारांना किती कमिशन ?
रेशन दुकानदारांनी आता लाभार्थी व्यक्तींना धान्य वितरित केल्यानंतर एका क्विंटल मागे फक्त दीडशे रुपये मिळवायचे आहेत मात्र सध्या मोफत आणि वाटप केल्यामुळे विक्रीनंतर कमिशन दुकानदारांना कसे मिळणार सरकार तर देणार आहे. काही कमिशन त्याबाबत अजून स्पष्टपणे सांगण्यात आले नाही.
2021 च्या मे मध्ये शासनाने मोफत धन्य वाटप चा निर्णय घेतलेला होता. त्यावेळी शासनाने कमिशन देऊ असे सांगितले होते. पण अजून दुकानदारांना कमिशन मिळाले नाही मग नोव्हेंबर डिसेंबर मधील धान्याच्या उजनीसाठी स्वतः दुकानदारांनी पैसे भरून धान्य उचलले आहे. आता याबाबत धान्य मोफत वाढवण्यात येणार आहे का सोबतच या महिन्यामध्ये पैशांचे कमिशन काय असणार आहे असा प्रश्न दुकानदारासमोर उभा आहे.
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !