राज्यातील शासकीय व इतर पात्र पुर्णकालिन कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुन केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे . या संदर्भातील राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि.10 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .
वाढीव DA मुळे वेतनात वाढलेली रक्कम –
4 टक्के महागाई भत्ता वाढीमुळे आपल्या वेतनांमध्ये किती रक्कम वाढेले हे काढण्यासाठी आपल्या मुळ वेतनाला 4 ने गुणावे व आलेल्या रक्कमेला 100 ने भागावे आलेली रक्कम हि 4 टक्के वाढीव डी.ए वेतनात झालेली वाढ येईल . उदा – X चे मुळ वेतन 30,000/- असेल तर त्या कर्मचाऱ्यास 4 टक्के वाढीव डी.ए मुळे वेतनांमध्ये वाढलेला पगार = 30,000 X 4 / 100 = 1,200/- ( वेतनात वाढलेली रक्कम )
जुलै 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीमधील डी.ए फरकाची रक्कम –
माहे जुलै 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीमधील डी.ए फरकाची रक्कम काढण्यासाठी वरील सुत्राप्रमाणे 12,00 रुपये हे एक महिन्यांचे वाढीव पगार आहे . तर 1200 X 6 = 7200/- रुपये ही रक्कम डी.ए फरकाची येईल .
सरकारी कर्मचारी विषयक , शासकीय योजना व भरती तसेच ताज्या मराठी बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !