Government Scheme : या सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही प्रति महिना मिळवू शकता पाच हजार रुपये ते दहा हजार रुपये , फक्त अशाप्रकारे गुंतवणूक करा !

Spread the love

Government Scheme : केंद्र शासन व राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी विविध शासकीय योजना राबवत आहे. त्या योजनेचा लाभ घेऊन नागरिकांची आर्थिक बाजू बळकट होण्यास मदत होत आहे. आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत. त्या योजनेचा लाभ घेऊन तुम्हाला भविष्यात मोठा आर्थिक फायदा होईल चला तर बघूया शासनाची ही नवीन योजना.

पेन्शन योजनेच्या माध्यमातून वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर लोकांना महिन्याला एक हजार रुपयांपासून पाच हजार रुपये पेन्शन मिळते. तुम्हाला किती पेन्शन मिळते हे तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. गुंतवणूक करण्याचा वयोगट हा 18 ते 40 वर्ष असून या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचे बचत खाते असणे गरजेचे आहे. या सोबतच आधार कार्ड क्रमांक असावा आणि आधार कार्ड ची लिंक असलेला मोबाईल क्रमांक असावा.

National Pension System

मासिक पेन्शन मिळवायची असेल तर तुमच्यासाठी राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेच्या माध्यमातून जमा केलेली संपूर्ण रक्कम बाजार मध्ये गुंतवली जाते. त्यामुळे तुम्हाला शासनाच्या माध्यमातून दहा टक्के परतावा देखील मिळतो. वास्तविकपणे बघितले तर एनपीएस मधील कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय वर्ष 18 ते 70 आहे तो या योजनेचा लाभ हमखास घेऊ शकतो. पेन्शन मिळवण्याकरिता तुम्हाला वयाच्या साठ वर्षापर्यंत गुंतवणूक करायचे आहे. जर एखाद्या व्यक्ती सेवानिवृत्ती खातेदाराला अल्पकालीन निधीची गरज भासली तर निवृत्तीनंतर देखील खात्यातील शिल्लक रकमेपैकी 60 टक्के रक्कम अगदी सहजपणे काढता येते. यापैकी 40 टक्के रक्कम पेन्शन मध्ये टाकणे गरजेचे आहे.

मित्रांनो जेष्ठ नागरिक बचत योजना विशेष म्हणजे साठ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांकरिता राबवली आहे. याशिवाय मित्रांनो 55 ते 60 वर्षे वयोगटातील नागरिक ज्यांनी वी आर एस घेतले आहे ते देखील या योजनेमध्ये बिनधास्त गुंतवणूक करू शकतात. यासोबतच मदत ठेवींच्या तुलनेत व बचत खात्यांच्या तुलनेत या योजनेच्या माध्यमातून व्याज जास्त भेटते.

Pradhan Mantri Vay Vandana Yojana

मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? एलआयसी ही एक प्रधानमंत्री वय वंदना योजना राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून कोणताही ज्येष्ठ नागरिक सहजपणे गुंतवणूक करू शकतो. विशेष म्हणजे जास्तीत जास्त 15 लाख पर्यंत गुंतवणूक करून तुम्हाला महिन्याला नऊ हजार रुपये इतकी पेन्शन मिळू शकते. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चार टक्के व्याज मिळते यासोबत तुम्ही या योजनेमध्ये दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली तर प्रति महिना तुम्हाला एक हजार रुपये पेन्शन चालू होईल.

Senior Pension Insurance Scheme

आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की वरिष्ठ पेन्शन विमा योजना ही योजना साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांकरीता राबवण्यात आलेली शासकीय योजना आहे. ही योजना एलआयसीच्या अंतर्गत चालवण्यात येत असून यामध्ये तुम्हाला एकर कमी गुंतवणुकीवर आठ टक्के व्याजदर मिळत आहे. वर्षाकरिता ही पेन्शन तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मिळत आहे. यासोबतच मासिक, त्रैमासिक, सामासिक व वार्षिक या आधारावर तुम्ही तुमच्या इच्छेने पेन्शन घेऊ शकता.

Leave a Comment