बजाज कंपनीने साकार केले सर्वात कमी किंमतीत व आकाराने लहान कार ! जाणून घ्या किंमत !

Spread the love

प्रसिद्ध असलेली दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाजने काही दिवसापूर्वी आपली bajaj qute लॉन्च केली आहे. आतापर्यंत ही कार फक्त व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध होती. परंतू लवकरच ती खासगी ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

आपल्या देशात स्वस्त कारची मागणी नेहमीच राहीलेली आहे. त्यातूनच रतन टाटा यांनी आपली महत्वाकांक्षी Tata nano कार लाँच केली होती. त्या कारच्या आठवणी अजुनही लोकांच्या मनात आहे. तर मारुतीची ऑल्टो कार सुद्धा ग्राहकांच्या मनात भरलेली आहे. आता कमी किमतीच्या बजेट मध्ये कारच्या पर्यायांपैकी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे .

बजाजची क्यूट क्वाड्रिसायकल श्रेणीमध्ये येते.या सेगमेंटला थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरच्या मध्ये ठेवण्यात आले आहे. या खास सेगमेंटमुळेच ही कार लाँच करण्यात खुप वेळ गेला. 2018 मध्ये ही क्यूट कार लाँच करण्यात आली आहे. कंपनीने ही कार ऑटो रिक्षाला पर्यायी गाडी म्हणून बनवली आहे . तसेच तिची किंमत 2.48 लाख इतकी ठेवण्यात आली होती. यामध्ये ऑटो रिक्षा प्रमाणेच 3 जणांना बसण्याची व्यवस्था होती. तसेच यामध्ये रूप देण्यात आले आहे. तिच्यात कम्फर्टेबल स्लायडिंग मिळते. तसेच दर्जेदार प्रोटेक्शनही देण्यात आले आहे.

या कारचा टॉप स्पीड सध्यातरी ताशी 70 km राहण्याची शक्यता आहे. मात्र तिची पॉवर 10.8 एपी वरुन वाढवून 12.8 करण्यात आली आहे. या कारचे वजनही 17 किलोने वाढले आहे. ह्या कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही रूपात ही कार उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिनमध्ये या कारचे वजन 451 किलो आहे. तर सीएनजीमध्ये याचे वजन 500 किलो इतके आहे. अतिरिक्त 17 किलो वजन वाढण्यामागे स्टॅडर्ड विंडो आणि एसी हे कारण असू शकते.

या कारमध्ये ड्राइवरसह 4 जणांना बसण्याची व्यवस्था आहे. ह्या कारचे इंजिन Bajaj Qute 4W आणि 216 cc सिंगल सिलेंडर अशा प्रकारचे आहे . ते 10,8 हॉर्सपॉवर आणि 16.1 एन एम टाॅर्क निर्माण करते. आता या कारची पॉवर 2 बीएचपीने वाढवली असली तरी टाॅर्क आधीप्रमाणेच राहील.

Leave a Comment