सातव्या वेतन आयोगानुसार राज्य शासन सेवेतील अनुदानित आश्रमशाळांमधील पुरुष अधिक्षक , स्त्री अधिक्षिका व लिपिक यांना आश्वासित प्रगती योजना अंतर्गत 10 , 20 व 30 वर्षे लाभ अनुज्ञेय करणेबाबत अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांचे महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहेत . या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात …
अनुदानित आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना समन्वय समिती सोबत झालेल्या सहविचार सभेत पुरुष अधिक्षक , स्त्री अधिक्षिका व लिपिक कर्मचाऱ्यांना 10,20 व 30 ही योजना लागु करणे बाबत चर्चा करण्यात आली होती . यानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ( गट क व गट ड मधील ) 12 वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे , तसेच खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांना 12 वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे .
त्याचबरोबर सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबतच्या राजय वेतन सुधारणा समिती 2017 ने त्यांच्या अहवाल खंड 01 मध्ये केलेल्या शिफारशी उचित फेरफारसह स्विकारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे .सदरहू शिफारशी स्विकृत केल्याच्या परिणामी ज्या ठिकाणी सविस्तर आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता आहे .त्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे .
राज्य शासकीय तसेच जिल्हा परिषद शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 10,20,30 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दि.01.01.2016 पासून अमलात आणली आहे .या वरील सर्व संदर्भाचा एकत्रित विचार करुन खाजगी अनुदानित आश्रमशाळेतील अधिक्षक / अधिक्षिका लिपिक यांना शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत 10,20,30 वर्षांच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासति प्रगती योजना लागू करता येणार नाही अशी या कार्यालयाची धारण आहे , तरी धारणा पक्की करण्याकरीता मा.उपआयुक्त अमरावती यांकडुन सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
या संदर्भात मा.अपर आयुक्त अमरावती यांच्या कडून निर्गमित झालेला सविस्तर पत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

सरकारी कर्मचारी विषयक पदभरती योजना व ताज्या बातम्यांच्या रेग्युलर अपडेट साठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !