सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी आनंदाची बातमी समोर येणार आहे . ती म्हणजे वेतन आयोगामध्ये वाढ करण्यात येणार आहे .सरकारी कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी वेतन आयोगामध्ये बदल करण्यात येत असतो , त्या अनुषंगाने सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग लागु करण्याची हालचाली केंद्रीय स्तरावर सुरु झाल्या आहेत .
फिटमेंट फॅक्टर असणार मुख्य मुद्दा –
कर्मचाऱ्यांना नवा वेतन लागु करणे म्हणजे कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मूळ वेतनाच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करणे . सध्या सातव्या वेतन आयोगानुसार किमान मुळ वेतन 18000/- रुपये असून कमाल मुळ वेतन 56,000/- रुपये आहे .या मुळ वेतनांमध्ये 3.68 पट फिटमेंट फॅक्टर वाढ प्रमाणे लागु केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हा 26,000/- रुपये होईल .
केंद्रीय स्तरावर हालचाली –
आठवा वेतन आयोग लागु करणेसंदर्भात कामगार युनियन कडुन केंद्र सरकारला नुकतेच निवेदन देण्यात आलेले असून , यामध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि मुळ वेतनाच्या वाढीबरोबर इतर लागु असणाऱ्या वेतन व भत्ते मध्ये देखिल वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
पाचव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये 31 टक्के वाढ करण्यात आलेली होती , तर सहाव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 54 टक्के वाढ लागु करण्यात आलेली होती .तर सातव्या वेतन आयोगामध्ये केवळ 14.29 टक्के वाढ करण्यात आलेली होती .केंद्रीय स्तरावर आठव्या वेतन आयोगाची हालचाली मोठ्या प्रमाणात चर्चेत असल्याने केंद्रीय वित्त मंत्रालयाकडुन याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे कामकाज सुरु आहे