शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अधिवेशनांमध्ये मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेल आहे . शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अत्त्युत्कृष्ट कामाबद्दल दिनांक 01.01.2006 ते दि.01.10.2008 मधील आगाऊ वेतनवाढींची रक्कम अदा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागांकडुन दि.27.12.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .
सामान्य प्रशासन विभागांकडुन दि.15.12.2022 रोजी शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अत्युत्कृष्ट कामाबद्दल दि.01.10.2006 ते 01.10.2008 मधील आगाऊ वेतनवाढींची रक्कम अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्णय निर्गमित करण्यात आला होता .या निर्णयाच्या अनुषंगाने , आगाऊ वेतनवाढीबाबत समितीच्या शिफारशीनुसार शासकीय सेवेतील अत्त्युत्कृष्ट कामासाठी ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना सन 2006 , 2007 व 2008 मध्ये पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार सहाव्या वेतन आयोगाची वेतननिश्चिती करताना सदर आगाऊ विचारात घेण्यात आलेल्या नाहीत .
त्यामुळे पाचव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीनुसार अनुज्ञेय झालेल्या आगाऊ वेतनवेतनवाढीच्या रकमा समायोजित झाल्या आहेत . दि.03.07.2009 च्या शासन परिपत्रकानुसार 6 च्या वेतन आयोगातील वेतन निश्चिती करताना समायोजित झाल्यामुळे वसूल झालेली आगाऊ वेतनवाढीची रक्कम संबंधितांना ठोक स्वरुपात अदा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे . या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा दि.27.12.2022 रोजीचा शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता .
